सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला झालेल्या १२ लाखांच्या दंडाबाबत ठाकरे शिवसेना आक्रमक
सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला झालेल्या १२ लाखांच्या दंडाबाबत ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे-फडणवीस सरकार, अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात मंगळवारी (ता.६) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने १२ लाखांचा दंड केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड केला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार, अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मंगळवारी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओरोस येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.