
बिबट्याने मुक्काम हलवल्याचा वनखात्याचा दावा
गेले काही महिने रत्नागिरी तालुक्यातील पावस, गणेशगुळे, मावळंगे, गावखडी भागात बिबट्याने गावातील लोकांवर विशेषतः दुचाकीवरून जाणार्या लोकांवर हल्ले केले होते. त्यामध्ये काहीजण जखमीही झाले होते. जखमी झालेल्यांना वनखात्याच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र वनखात्याने सर्व यंत्रणा राबहूनही बिबट्या काही वनखात्याच्या जाळ्यात मिळाला नव्हता. दरम्याने वनविभागाकडून बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ऑक्टोबर महित्यात प्रस्ताव पाठविला होता. परंतु सरकारी लालफिती कारभारामुळे हा प्रस्ताव अद्यापही नागपूर कार्यालयात पडून आहे. दरम्याने वनखात्याने पंचक्रोशीत रात्रीची गस्त सुरु ठेवली असली तरी बिबट्याने मात्र तेथून मुक्काम हलवल्याचे वनखात्याचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com