रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या धर्मशास्त्र संशोधन प्रकल्पाला मंजुरी
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली यांच्याद्वारे अष्टदशी परियोजनेंतर्गत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी, उपकेंद्राला अन्तर्विद्याशास्त्रीय धर्मशास्त्रविषयक संशोधन हा प्रकल्प प्राप्त झाला आहे. या प्रकल्पासाठी ४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.या प्रकल्पाचा उद्देश प्राचीन भारतीय धर्मशास्त्राच्या विविध पैलूंचे सखोल अध्ययन व संशोधन करणे महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाचे संपूर्ण कार्य भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र येथे केले जाणार आहे. या प्रकल्पाचे प्रमुख पर्यवेक्षक भारतीय दर्शन विभाग अधिष्ठाता डॉ. मधुसुधन पेन्ना हे असून रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे कार्यान्वयन होणार आहे. www.konkantoday.com