
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी सुधाकर शंकर देसाई यांचे दुःखद निधन
रत्नागिरी येथील कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई याचे वडील सुधाकर शंकर देसाई याचे आज कुवारबाव येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
हातखंबा गावचे प्रतिष्ठित नागरिक असलेले सुधाकर देसाई हे रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये पूर्वी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
सुधाकर देसाई हे अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते.
कुवारबाव येथील निवृत सरकारी कर्मचाऱ्यांसोबत ते सामाजिक कार्यात कार्यरत होते अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमात त्याचा सहभाग असायचा.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी चार वाजता चर्मा लय येथील स्मशानभूमीत होणार आहे
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून नातवंडे मुलगी जावई असा मोठा परिवार आहे.
www.konkantoday.com