
दुर्गा विसर्जनाकरिता वाहने पर्किंगबाबत आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात 05 व 06 ऑक्टोबर 2022 रोजी दुर्गादेवी मुर्तीचे मांडवी समुद्र किनारी विसर्जन होणार आहे. दुर्गादेवी मुर्ती विसर्जनाकरीता घेऊन येताना मुर्तीसह वाहनेसुध्दा असल्याने मांडवी समुद्र किनारी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळी विसर्जनाकरीता सुमारे 5 ते 6 हजार जनसमुदाय एकत्रित येत असल्याने तसेच विसर्जन पाहण्याकरीता सुध्दा मोठया प्रमाणात जनसमुदाय मांडवी समुद्रकिनारी येत असतो. अशावेळी वाहने पार्किंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मांडवी समुद्र किनारी पणन अभियंता विभागाकडून घालण्यात आलेला धुपप्रतिबंधक बंधार्यामुळे मांडवी समुद्र किनार्याचा बहुतांश भाग हा बंधार्यामध्ये गेल्याने विसर्जनाकरीता जागा अपुरी पडणार आहे.
05 व 06 ऑक्टोबर 2022 या दिवशी भुते पान शॉप ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान मांडवी समुद्र किनारी विसर्जन ठिकाणी दुर्गादेवी मुर्ती घेऊन येणार्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश निषिध्द होणेबाबत अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (4) चा कायदा 22 वा नुसार प्राप्त अधिकारान्वये 05 ऑक्टोबर व 06 ऑक्टोबर 2022 या दिवशी रत्नागिरी तालुक्यातील मांडवी समुद्र किनारी विसर्जन ठिकाणी दुर्गादेवी मुर्ती घेवून येणार्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेशास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (4) नुसार या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.