निवडणूक रोख्यांतील कथिक गैरव्यवहाराची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
निवडणूक रोख्यांतील कथिक गैरव्यवहाराची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, जे. बी. पारधिवाला, मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निकाल दिला होता.फेब्रुवारी २०२४ सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे घटनाबाह्य असल्याचा निकाल देऊन ते रद्दबातल ठरवले होते. त्यानंतर निवडणूक रोख्यातील कथित गैरव्यवहाराची विशेष तपास पथकाच्या वतीने चौकशी केली जावी, अशा मागणी करणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.या याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळल्या. या प्रकरणात घटनेतील कलम ३२ नुसार आम्ही आमचे अधिकार वापरू शकत नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.”जेव्हा निवडणूक रोखे विकत घेतले गेले आणि राजकीय पक्षांना ते देणगी म्हणून देण्यात आले, त्या वेळी संसदत तसा कायदा मंजुर झालेला होता. शिवाय राजकीय पक्षांनी यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप फक्त तर्कांच्या स्वरूपात आहे,” असे या निकालात म्हटले आहे.