ताम्हिणी घाट ५ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद!
ताम्हिणी घाटाजवळील आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता खचला आहे; नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता आजपासून (शुक्रवार) ५ ऑगस्टपर्यंत हा रस्ता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. यामुळे ताम्हिणी घाटमार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.*हे ठिकाण ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येते. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून, वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. तथापी पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे, तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी होते. हे लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ रस्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.