तांत्रिक अडचणी येत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपास मंजुरी

राज्यात काही दिवसांपासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन करण्यास मान्यता देण्याची विनंती क्षेत्रीय कार्यालयांनी केली होती. यानुसार आता फक्त जुलै २०२४ चा विलंबित धान्यपुरवठा ऑफलाईन पद्धतीने करावा, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button