चालत्या दुचाकीवर वीज खांब आणि विद्युत वाहिनी पडली, सुदैवाने दुचाकीस्वार बचावला
चालत्या दुचाकीवर वीज खांब आणि विद्युत वाहिनी पडली. मात्र दुचाकीस्वार पांडुरंग धामणे यांचे नशीब बलवत्तर म्हणावे लागेल, वीज वाहिनी दुचाकीवर पडण्याआधीच त्यात बिघाड होऊन विजप्रवाह खंडित झाला अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यता होती. ही थरकाप उडवणारी घटना संगमेश्वर तालुक्यातील पोचरी येथे गुरुवारी सकाळी घडली.
फुणगूस खाडीभागातील पोचरी येथील ग्रामपंचायत कर्माचारी पांडुरंग धामणे हे पाणी सोडण्याचे काम करतात ते नेहमी प्रमाणे पाणी सोडण्यासाठी स्वतःच्या दुचाकी वरून जात होते. वाघजाई मंदिर या ठिकाणी अचानक मोठा आवाज करत झाडाची फांदी विद्युत भारीत वाहिनीवर पडल्याने विजेचा सिमेंट खांब खेचला जाऊन विद्युत वाहिनी व खांब पांडुरंग धामणे यांच्या चालत्या दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीसह पांडुरंग धामणे हे रस्त्यावर पडले. पांडुरंग धामणे यांचे नशीब बलवत्तरच म्हणून अकरा के. व्ही. विद्युत भारीत विज वाहिनी कोसळलेल्या झाडाच्या फांदी बरोबर आपल्या सोबत सिमेंट खांबाला घेऊन जमिनीवर व दुचाकीवर कोसळण्यापूर्वी वीज प्रवाह मध्ये बिघाड होऊन खंडीत झाल्याने पुढील जीवित हानी टळली.