गोवा बनावटीचा मद्यसाठा प्रकरणाचे कनेक्शन सावंतवाडी पर्यंत पोहोचले
खेड तालुक्यातील भेलसईनजिक येथील पोलिसांनी सव्वादोन लाखांचा मद्यसाठा व झायलो कारसह चौघांना रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस तपासात चिपळूण कनेक्शन असल्याचे समोर आले. हस्तगत मद्यसाठा सावंतवाडीतून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. यातील एका संशयिताच्या गुन्हेगाारी पार्श्वभूमीचा येथील पोलिसांकडून पडताळा करण्यात येत असल्याचे समजते.
बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या मद्यसाठ्याची वाहतूक प्रकरणात राजाराम तानाजी जोईल हाच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
www.konkantoday.com