संभाजीराजेंबाबत वादग्रस्त विधान; स्वराज्य संघटनेनं जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडली
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच रक्त हिरवा आहे अशा पद्धतीची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी मांडली होती. याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताफ्यासह ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर बांबूने हल्ला कऱण्यात आला. यावेळी गाडीची काच फोडण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा हल्ला कऱण्यात आला.