
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणार्या तारांगणातून पालिकेला २९ लाखांचे उत्पन्न
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणार्या तारांगण आणि स्वा. सावरकर नाट्यगृहाकडून रत्नागिरी नगर परिषदेला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. तारांगणने तर दोन वर्षात २९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. अद्यावत झालेल्या नाट्यगृहाच्या भाड्यातूनही चांगले उत्पन्न मिळत आहे. या दोन्ही वास्तू पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने साकारलेल्या आहेत. राज्यातील २५९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या तारांगणातील प्रयोगाचा आस्वाद घेतला आहे. माळनाका येथील श्रीमान स्व. बाळासाहेब ठाकरे तारांगणातील शो डिसेंबर २०२२ च्या अंतिम आठवड्यापासून सुरू झाले. संपूर्ण राज्यातील २५९ शाळांतील विद्यार्थ्यांनी तारांगणात जावून शो पाहिले. सुट्टीच्या कालावधीत जितक्या सहली आल्या त्यातील विद्यार्थ्यांनी तारांगणात शो पाहिला. त्यावेळी दररोज ४ ते ५ शो केले जात होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तारांगण शो चा प्रतिसाद मर्यादित झाला आहे. त्यामुळे रोजचे दोन किंवा तीन शो होत आहेत. कोट्यवधी रुपयांचे तारांगण व्हावे, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी नेटाने प्रयत्न करून शासनाकडून निधी मिळवला. स्वा. सावरकर नाट्यगृह अत्याधुनिक करण्यासाठी पालकमंत्र्यांनी निधी मिळवून दिला.www.konkantoday.com