योग्य ती दक्षता घेतल्याने निवृत्त सरकारी अधिकाऱ्याचे हरवलेले पाकीट मिळाले
_दि २५ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७.३० चे दरम्याने श्री शशिकांत भावे निवृत्त सरकारी अधिकारी यांचे पाकीट जोशी पाळंद नाक्यावर पडले. सदर पाकिटात त्यांची सर्व महत्वाची कागदपत्रे होती. त्याचबरोबर श्री भावेनी आपला मोबाईल नंबर नावासकट लिहून तो कागदही पाकीटात होता त्यामुळे त्यांचा शोध घेता आला व चौकशी अंती त्यांचे पाकीट खिशातून पडल्याचे सांगितले. त्याना त्यांचे पाकीट सर्व कागद पत्रांसह परत देण्यात आले त्यामुळे त्यांची पुढील नुकसान टळले त्यामुळे त्यानी खूप समाधान व्यक्त केले व धन्यवाद दिले.