
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दापोलीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.. आठ दिवसात दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा…
दापोली :-*मनसेच्या वतीने दापोली नगरपंचायत मध्ये निवेदन देण्यात आले. त्यावेळेस मुख्याधिकारी गायकवाड, कर्मचारी सावके, जाधव, संदिप जाधव यांच्या समोर दापोली शहराची झालेली दुरावस्थे बद्दल चर्चा झाली. यावेळी श्री गणपती विसर्जन तलाव, आसराचा पुल, दापोली शहरातील खड्डेमय रस्ते, अशा विविध विषयांवर चर्चा व निवेदन देण्यात आले. तसेच या विषयाची ८ दिवसात दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष, मा. नगरसेवक सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठे, शहराध्यक्ष साईराज देसाई, उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले, शहर सचिव हाफिज महालदार, मनविसे शहराध्यक्ष राहुल शिंदे, उपशहराध्यक्ष अरविंद पुसाळकर, प्रसिध्दी माध्यम प्रमूख सुजित गायकवाड, प्रविण पोवार, विजय रच्चा, विजय चव्हाण उपस्थित होते.