
राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकीला शौकत मुकादम यांनी अनुपस्थिती दाखवून नाराजी व्यक्त केली?
चिपळूण स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच जिल्हा राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक शुक्रवारी सावर्डत झाली. या बैठकीत खासदार सुनिल तटकरे यांनी कार्यकत्त्यांना’ कामाला लागा,असा आदेश देत या निवडणुकीचे रणशिंग फुकले. याच बैठकीत ज्येष्ठांचा सन्मान व्हायला हवा अशी भूमिकाही खा.तटकरे यांनी मांडली.या बैठकीला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तळमळीने काम करणारे माजी सभापती शौकत मुकादम यांची अनुपस्थिती व त्याची चर्चा सुरु होती.शौकतभाईची अनुपस्थिती लक्षात घेऊन खा तटकरे यांनी ही भूमिका मांडली असावी , असे मानले जात आहे स्पष्टवक्ते असलेल्या शौकतभाई मुकादम यांनी यापूर्वीही ‘आम्ही भांडी घासायची का’,असा प्रश्न थेटपणे पक्ष नेतृत्वाला विचारला होता.त्यामुळे कालच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने शौकतभाई मुकादम यांची नाराजी उघडपणे दिसून आली .मुकादम यांची ‘ लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झगडणारे व पक्षाशी निष्ठावंत गेली अनेक वर्षे ते पक्षात एकनिष्ठपणे काम करीत आहेत.काही वर्षे तालुकाध्यक्ष व वर्ष-सव्वा वर्षासाठी पंचायत समितीचे सभापतीपद या व्यतिरिक्त आजवरच्या राजकीय कारकीर्दीत काही मिळालेले नाही पुराच्या वेळी व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अन्य पक्षाचे नेते जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते मात्र राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते न फिरकल्याने मुकादम यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे मुकादम यांच्या भूमिकेबाबत पक्षातील श्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com