पोटच्या लेकीवर अत्याचार, न्यायालयाने नराधम बापास २० वर्षाची सप्त मजुरीची शिक्षा ठोठावली
पोटच्या अल्पवयीन लेकीवर वारंवार अत्याचार करणार्या खेड तालुक्यातील नराधम बापास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच २५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचाही समावेश आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले. ही घटना ऑक्टोबर २०२० मध्ये घडली होती.खेड तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या नराधम बापाने स्वतःच्या मुलीवर सतत अत्याचार केला. ही बाब तिने आईच्या कानावर घातल्यानंतर आईने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने नराधम बापास बेड्या ठोकल्या होत्या. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. पडित मुलीची साक्ष व कागदोपत्री तसेच वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला. त्याला २५,००० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षाही सुनावली. www.konkantoday.com