दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार- मनोज जरांगे-पाटील यांचा दावा
दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार असल्याचा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.३१) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत केला.प्रवीण दरेकर यांनी काल रात्री मुंबईत बैठक घेतली. या बैठकांमधून मराठ्यांचे आंदोलन चिघळवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. जरांगे-पाटील म्हणाले की, माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मराठा आता कुठल्याही पक्षाला महत्त्व देत नाही, त्यांना पक्षात राहायची इच्छा राहिलेली नाही. आता लढा सामान्यांच्या हातात आहे. आता टेन्शन घेत नाही. आता लवकरच पर्दाफाश होणार आहे.