चिपळूण शहरात बहाद्दूरशेख नाका येथे उभी राहणार पंचायत समितीची सहा मजली इमारत

गेल्या काही वर्षापासून चिपळूण पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. अखेर बहाद्दूरशेख नाका येथील सभापती निवासस्थानाच्या जागेत पंचायत समितीची नवीन इमारत बीओटी तत्वावर उभारण्याचे नियोजित आहे. या ठिकाणी सुमारे सहा कोटी खर्चाची सहा मजली इमारत उभारण्यात येणार असून पंचायत समितीचे सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मंगळवारी आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेवून निधी संदर्भात चर्चा केली. यावेळी चिपळूण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम तातडीने मार्गी लागवण्याचे आश्‍वासन देण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button