गर्भपातप्रकरणी एमआयडीसी मधील शिवगण यांच्या साई हॉस्पिटलचा नर्सिंग होमचा परवाना रद्द
_गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या रूग्णांना दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहरानजिकच्या टीआरपी एमआयडीसी येथील साई हॉस्पिटलवर जिल्हा आरोग्य विभागाने या हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली.ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे प्रमुखडॉ. अनंत नारायण शिवगण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून त्या रूग्णांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाला सोबत घेवून साई हॉस्पिटलवर छापा टाकून वैद्यकीय पथकासह ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून गोळ्या, साहित्य जप्त केले होते. www.konkantoday.com