ईडीने (ED) मनी लाँड्रींगप्रकरणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या
लोकसभा निवडणुकांपूर्वी काही दिवस अगोदर कमी झालेल्या ईडीच्या धाडी पुन्हा सुरू झाल्याचं दिसून येत आहे. कारण, ईडीने (ED) मनी लाँड्रींगप्रकरणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यात ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. ईडीकडून मनी लाँड्रींग प्रकरणी पुण्याच्या एम. एस. शिव पार्वती साखर कारखाना आणि इतर कंपन्यांच्या खात्यात पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. एम/एस. हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि. आणि त्यांचे व्यवस्थापक नंदकुमार तासगांवकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवाले यांच्या बँक लोन फसवणूकप्रकरणी हे अभियान राबवण्यात आलं आहे.