आज गुरुवारपासून जिल्ह्यात महसूल पंधरवडा

रत्नागिरी, : आज गुरुवार दि. 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. उद्या जिल्हा नियोजन सभागृहात महसूल दिन व पंधरवड्याचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी दिली. 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवडा शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, 2 ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, 3 ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, 4 ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, 5 ऑगस्ट रोजी “कृषी मार्गदर्शन कार्यक्रम”, 6 ऑगस्ट रोजी “शेती पाऊस आणि दाखले” आणि 7 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 8 ऑगस्ट महसूल जनसंवाद, 9 ऑगस्ट महसूल ई प्रणाली, 10 ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगस्ट एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा, 13 ऑगस्ट महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी संवाद व प्रशिक्षण, 14 ऑगस्ट महसूल पंधरवडा वार्तालाप, 15 ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण” व महसूल सप्ताह सांगता समारंभ” यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच उद्या दि. 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल पंधरवडानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button