रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक संपावर?
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक गेली 19 वर्षे अल्प मानधनावर काम करत आहेत. तरीही त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. गेले तीन महिने त्यांचे मानधन न झाल्यामुळे चालकांनी 1 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद शासनाला दिला आहे. चालकांनी आंदोलन केल्यास रुणसेवेवर मोठा परिणाम होणार आहे.जिल्ह्यात 102 या रुग्णवाहिकेवर वाहनचालक 2005 पासून अल्प मानधनावर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांवर रात्रंदिवस हे चालक रुग्णांना सेवा देतात. राष्ट्रीय सुटीच्या दिवशीही वाहनचालक काम करतात. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. कोणत्याही वेळी सेवा देण्यास तत्पर असणार्या चालकांना अल्प मानधनावर काम करावे लागते. तेही वेळेवर मिळत नसल्याची खंत वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात आली.