यशश्री शिंदे हिच्या क्रूरहत्येच्या निषेधार्थ चिपळूण व्यापारी महासंघातर्फे उद्या चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद
चिपळूण १ऑ.:- *उरणमधील यशश्री शिंदे हिच्या क्रूरहत्येच्या निषेधार्थ चिपळूण व्यापारी महासंघातर्फे उद्या शुक्रवार 2 ऑगस्ट 2024 रोजी चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याचा शेकडो व्यापा-यांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे आज १ऑगस्ट गुरुवार रोजी या संदर्भात चिपळूणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला गालबोट लागले.या मोर्चात शांततेत सुरू असलेल्या मोर्चातील मोर्चेकरांना उद्देशून एका महिलेने अर्वाच्च भाषा वापरल्याने वातावरण चांगलेच चिघळले होते.सदर महिलेला तत्काळ पोलीसांनी अटक केल्यानंतर चिपळूण मधील वातावरण शांत झाले.या सर्व प्रकारानंतर उरणमधील यशश्री शिंदे हिच्या क्रूरहत्येच्या निषेधार्थ चिपळूण व्यापारी महासंघातर्फे उद्या शुक्रवार 2 ऑगस्ट 2024 रोजी चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याचा शेकडो व्यापा-यांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे.