रत्नागिरी जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे १ लाखाहून अधिक अर्ज मंजूर

रत्नागिरी जिल्ह्यात आता लाडकी बहिण योजनेच्या अर्ज मंजुरी प्रक्रियेला वेग आला आहे. ८८ टक्के अर्जांची छाननी पूर्ण झाली असून छाननी झालेल्या अर्जांपैकी १ लाख ८१ हजार १२० अर्ज मंजूर झाले आहेत. १४ हजार ७७ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने पूर्ततेसाठी संबंधित तहसीलदारांकडे पाठवण्यात आल्याचे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात २ लाख ९३ हजार ६७६ लाभार्थी नोंद झाले आहेत. १ जुलैपासून जाहीर झालेल्या या योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button