मुंबई-गोवा महामार्गाची झालेली चाळण पाहता कॉन्ट्रॅक्टर आणि मंत्र्यांना जेलमध्येे जावे लागेल- आदित्य ठाकरे
सरकारचे खोके, जनतेला धोके हे सरकारचं धोरण आहे अशी घणाघाती टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची झालेली चाळण पाहता कॉन्ट्रॅक्टर आणि मंत्र्यांना जेलमध्येे जावे लागेल असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली . या पत्रकार परिषदेतून रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरून इशारा दिला आहे . खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक आणि मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. चाकरमानी कोकणात आता गणपतीला जातील. गडकरी यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी एकदा एकदा गाडीने जावं . मग कळेल किती काम झालय . कारण मुंबई असो वा ठाणे रस्त्यावरचे खड्डे मोजावे की खड्ड्यात रस्ते शोधावे अशी स्थिती निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला. सरकारवर टीका करताना ’बांद्रा वर्सोवा सी लिंकचे काम अजूनही सुरु झालेल नाही . लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम राज्यात सुरु आहे . काम होवो न होवो कॉन्ट्रॅक्टमध्ये कलेशन झालय . सरकारचे खोके, जनतेला धोके हे सध्यातरी धोरण सद्या सुरु आहे . पण दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याच काय झालं ? मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकर्णाच काम किती झालं ? हे आम्हाला महापलिकेने सांगाव .