
चाफवली रावणवाडी येथील एका १४ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली रावणवाडी येथील एका १४ वर्षीय मुलाने शुल्लक कारणावरून घराच्या पोटमाळ्यावर जात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार सदानंद रावण असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ओंकार हा नववीमध्ये शिक्षण घेत होता. ओंकार व त्याचा भाऊ कल्पेश हा रविवारी पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेला होता. पाणी घेवून पुन्हा घरी परतत असताना ओंकार याच्या डोक्यावरील हंडा खाली पडला. याबाबत भावाने विचारणा केल्याचा राग ओंकार याने मनात धरला. घरी आल्यानंतर ओंकार याने पोटमाळ्यावर जावून दरवाजा लावून दोरीच्या सहाय्याने गळफास लावुन घेतली.
www.konkantoday.com