महाडमध्ये अतिवृष्टी! शहर परिसरात पंधरा दिवसात चौथ्यांदा पूरसदृश्य स्थिती!!
महाड : गेल्या पंधरा दिवसात चौथ्यांदा महाड शहर व परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले असून महाड शहरात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे १०४, पोलादपूर येथे १२० तर महाड येथे ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.*रायगड, वाळण, वरंध या शेजारील भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. महाड शहराच्या सखल भागात दस्तुरी नाका पुराचे पाणी रस्त्यावर येऊ लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली आहे. यासंदर्भात महाड नगरपालिका प्रशासन येणाऱ्या सर्व आव्हानांना मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व अग्निशमन दल प्रमुख गणेश पाटील यांनी दिली. एनडीआरएफचे पथकही सज्ज असून नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.