बनावट नोटा प्रकरणी आणखी काही जण गुन्हे शाखेच्या रडारवर
बनावट नोटा प्रकरण, मुंबई गुन्हे शाखेचा कसून तपासबनावट नोटांचे कोकण कनेक्शन नुकतेच उघड झाले आहे. खेड आणि चिपळूणमधील चौघाजणांना मुंबई येथील गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गेल्या आठवड्यात करण्यात आली आहे. चौघाही जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयित आरोपींची संख्या आता पाचवर गेली आहे. या प्रकरणी आणखी काही जण गुन्हे शाखेच्या रडारवर असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.www.konkantoday.com