
दापोली शहरामध्ये महत्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार
_दापोली शहरामध्ये महत्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार असल्याने बेशिस्त वाहतुकीला यामुळे आळा बसणार आहे. याबाबत नगर पंचायतीच्या मासिक सभेत सिग्नल यंत्रणेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.नगर पंचायतीची मासिक सभा नगराध्यक्षा, ममता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. आंबा पॉईंट, एसटी स्टँडजवळ, बाबासाहेब आंबेडकर चौक, बुरोंडी चेकपोस्ट दापोली येथे सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे. www.konkantoday.com