साखरप्यात बिबट्याकडून पाळीव कुत्र्याची शिकार
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडी येथे घराच्या वरच्या मजल्यावर बाल्कनीत असलेल्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे साखरपा परिसरात भीतीचे वातावरण आहे.साखरपा भंडारवाडी येथील रहिवासी अभिजित दत्ताराम वैद्य यांच्या चॅम्प नावाच्या बिगल जातीच्या कुत्र्याची शनिवारी रात्री २.३० च्या सुमारास बिबट्याने शिकार केली. वैद्य यांनी घराच्या वरच्या मजल्यावर बाल्कनीत बिगल जातीच्या चॅम्प कुत्र्याला बांधले होते. झाडाचा आधार घेत बिबट्याने बाल्कनीत प्रवेश केला व कुत्र्यावर हल्ला करून ठार केले.www.konkantoday.com