
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचे भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विद्या चव्हाण यांच्या घरगुती वादात चित्रा वाघ यांनी हस्तक्षेप केला.तसेच आपल्या घरात असलेल्या वादाचा फायदा घेत चित्रा वाघ यांनी आपल्याविरोधात षढयंत्र रचल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपही ऐकवल्या. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय.“आम्ही हा ऑडिओ यासाठी ऐकवला की, चित्रा वाघ वारंवार म्हणतात की, आम्ही कुणाच्यामध्ये बोलत नाहीत. आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय. पण हा माझा अनुभव आहे की, माझ्या घरात पाच वर्षांपूर्वी झालं होतं, त्यावरुन चित्रा वाघ माझ्या सुनेला शिकवण्याचा प्रयत्न करतेय. विद्या चव्हाण तुला छळतेय, तुझ्याशी वाईट वागतेय. व्हिडीओ कसे टॅग करायचे ते चित्रा वाघ सांगत आहेत”, असा दावा विद्या चव्हाण यांनी केला.विद्या चव्हाण यांनी घेतलं फडणवीसांचं नाव“विशेष म्हणजे चित्रा वाघ यांना ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं स्वत: चित्रा बोलत आहेत. चित्रा वाघ सूनेचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करुन देतात, त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपण या प्रकरणाची जबाबदारी चित्रा वाघ यांना दिली आहे. चित्रा वाघ या तुम्हाला मदत करतील”, असं विद्या चव्हाण यांनी सांगितलंwww.konkantoday.com