
रत्नागिरी कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या इसमाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या राज्यस्थान येथील प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. राजवीर सिंह (वय ३९, रा. दुलाराम, किशनपुरा, चुरु, राजस्थान) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली