
दिवाणखवटी बोगद्याजवळ वेगमर्यादा ताशी १० कि.मी. ने वाढवली
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्याजवळ काही दिवसांपूर्वी रूळावर मातीचा भराव येवून वाहतूक ठप्प झाली होती. तेव्हापासून येथून मार्गस्थ होणार्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली होती. सुरूवातीचे दोन दिवस ताशी १० कि.मी. च्या वेगाने धावणार्या रेल्वेगाड्यांचा अपवाद वगळता त्यानंतर ताशी ३० कि.मी.च्या वेगाने रेल्वेगाड्या मार्गस्थ होत होत्या. या वेगात आणखी ताशी १० कि.मी.ची वाढ करण्यात आली असून आता ३० कि.मी. वेगाने रेल्वेगाड्या धावत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.www.konkantoday.com