
गुरुवारपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह**रत्नागिरी, दि. 30 (जिमाका) : 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहा साजरा करण्यात येत आहे.* 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, 2 ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, 3 ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, 4 ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, 5 ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, 6 ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा” आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण” व महसूल सप्ताह सांगता समारंभ”
* महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उदिद्ष्ट पार करणा-या अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दिनांक १ ऑगस्ट, हा दिवस “महसूल दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.