उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही भूमिका न मांडल्याने मराठा समाज आता आक्रमक
मराठा विरुद्ध ओबीसी अशा आरक्षणाच्या वादामुळे राज्याचं राजकीय तसेच सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीवर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे.याच मुद्द्यावरून मराठा बांधव उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सोमवारी मुंबईतील मातोश्री या निवास्थानी गेले होते.मात्र, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांना भेट दिली नाही. त्यामुळे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. मराठा आंदोलनाचा विरोधकांना निवडणुकीत चांगलाच फायदा झाला असून त्यांचे बंद पडलेले पक्ष आमच्यामुळेच सुरू झाल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही भूमिका न मांडल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. आज मुंबईतील ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर मराठा संघटना धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. हीच बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ठाकरेंच्या मातोश्री निवास्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.