
उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी साधला रत्नागिरीतील लाडक्या बहिणींशी संवाद
रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेसंबंधी लाडक्या बहिणीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन भाजपने राज्यभरात केले. रत्नागिरीत दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर झाला. या कर्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.या वेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने म्हणाले की, लाडक्या बहिणीसाठी देवाभाऊनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्याचे दोन हप्ते जमा झाले आहेत. केंद्रात मोदी यांचे सरकार तिसऱ्या वेळेला निवडून दिले. त्यामप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा सुद्धा जिंकायची आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये सुद्धा आपल्याला आपलं सरकार आणायचे आहे. जेणेकरून पार्लमेंट ते पंचायत या सगळ्या एका विचाराच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला सर्वांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. सबका साथ सबका विकास सबका प्रयास अशा माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदींचे नेतृत्व आज जगाला गवसणी घालताना आपण पाहतोय. आणि 2047 ला आपला देश आपण विकसित देश झाला पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प आपण सगळ्यांनी केलेला आहे. चांगल्या निकोप लोकशाहीचे नेतृत्व आपण करतोय. पुढची पिढी आपल्याला आजादीचा शतक महोत्सव पाहणारी आहे आणि या पिढीसाठी आपल्याला सर्वांगीण विकास करण्याकरता आपल्याला नियोजन करायचे आहे.या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले की, ग्रामीण भागातल्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांकडे एक स्वतःचे कुठेतरी दर महिन्याला पैसे असावेत या पैशातून तिने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सासू- सासरे असतील यांच्या आरोग्यासाठी पैशाची गरज लागली तर त्यांनी तिने ते पैसे स्वतः खर्च केले पाहिजेत. याच्या करता तिला दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत परंतु काही लोकांनी या योजनेचा विरोधात जाऊन ही योजना कशी सक्सेस होणार नाही याची करता सुद्धा कोर्टामध्ये गेले परंतु कोर्टाने सुद्धा या बाबतीत धुडकावून लावले. भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी यांनी या योजनेविषयी खूप खूप आभार मानले. अंधेरी, मुंबई येथून थेट प्रक्षेपण या वेळी दाखवण्यात आले. यावेळी मानसी मनोज पेजे, रा. मिऱ्या या महिलेने थेट संवाद साधला. रत्नागिरीतील महिलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून या योजनेविषयी समाधान व्यक्त केले.