२५० किमी ग्रुप रन करून ऑलीम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमू ला अनोख्या शुभेच्छा टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन चा आगळा वेगळा उपक्रम
फिटनेस टुरिझम हा विषय हाती घेऊन मागील ४ वर्षात कोकणात विविध उपक्रम सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या माध्यमातून आयोजित केले जात आहेत. कोकण कोस्टल मॅरेथॉन हा त्यातील एक अभिनव उपक्रम. कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या बरोबरीने रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन देखील या उपक्रमांचा एक भाग आहे. यामध्ये जास्तीत जास्त कोकणातले लोक सहभागी व्हावेत यासाठी टीम केसीएम च्या माध्यमातून प्रॅक्टिस रन तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या माध्यमातून ग्रुप राईड देखील आयोजित केल्या जात आहेत. रविवार दिनांक २८जुलै२०२४ रोजी झरीविनायक मंदिर भाट्ये इथे आयोजित केलेल्या या सामूहिक प्रॅक्टिस रन च्या माध्यमातून ऑलीम्पिक मध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. श्री झरीविनायक गणेशाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन सकाळी ६:३० वाजता ही ऑलीम्पिक शुभेच्छा रन सुरु झाली. वय वर्ष ८ ते वय वर्ष ७३ या वयोगातील जवळपास ५३ जण या ऑलीम्पिक शुभेच्छा रन मध्ये सहभागी झाले होते. सर्वानी मिळून जवळपास २५०+ किलोमीटर अंतर धावून पार केले आणि ऑलीम्पिक मध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमू ला शुभेच्छा दिल्या. सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या माध्यमातून टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन ने आयोजित केलेल्या या उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी च मोलाचं सहकार्य मिळालं. ओलीम्पिक शुभेच्छा रन मध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटू ना लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे चहा आणि अल्पोपहाराची सुविधा देण्यात आली. ही ऑलीम्पिक शुभेच्छा रन यशस्वी करण्यासाठी ऍडव्होकेट सचिन नाचणकर, डॉक्टर राज कवडे, एसआर सौ आरती दामले, एसआर डॉक्टर नितीन सनगर,एसआर महेश (बॉबी) सावंत, एसआर विनायक पावसकर,लायन्स क्लब रत्नागिरी चे अध्यक्ष गणेश धुरी, ला. पराग पानवलकर, एसआर ला. ओंकार फडके, ला. प्रसाद हातखंबकर, , जोशी फूड्स च्या सौ कांचन चांदोरकर, मैत्री ग्रुप चे श्री सुहास ठाकूरदेसाई,लोहपुरुष श्री समीर धातकर,श्री गजानन भातडे, श्री अविनाश फडके, सौ राधा बसनकर, सौ मानसी सचिन मराठे, श्री विक्रांत प्रसादे, श्री प्रफुल्ल शिर्के, श्री नारायण पाटोळे तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या संचालिका सौ. तेजा देवस्थळी यांनी विशेष मेहनत घेतली. पावसाळ्यातील,हिवाळ्यातील, उन्हाळ्यातील कोकण एक चांगलं ब्रॅण्डिंग करून जागतिक पटलावर पोचावं आणि कोट्यावधी लोक टुरिस्ट म्हणून कोकणात यावेत हा सुहेतू या सर्व उपक्रमांमागे आहे. यावर्षीपासून या सर्व उपक्रमांना कोकण कनेक्टिव्हिटी मुव्हमेंट (केसीएम) असं संबोधलं जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गत सायक्लोथॉन,मॅरेथॉन तसेच लांब पल्याची अल्ट्रा मॅरेथॉन हे प्रमुख उपक्रम आयोजित केले जाणार आहेत असं यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संचालक श्री प्रसाद देवस्थळी यांनी सांगितलं.