शरद पवार ऑगस्ट महिन्यात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार
मुंबई :* शरद पवार ऑगस्ट महिन्यात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. ऑगस्ट महिन्यात शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून होणार आहे. राष्ट्रवादीने मागच्या विधानसभेत लढलेल्या मतदारसंघात सुरुवातीचा दौरा असणार आहे. अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांवर थोरल्या पवारांचं विशेष लक्ष असणार आहे. सभेच्या माध्यमातून शरद पवार प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.