मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

रत्नागिरी-* भारत निवडणूक आयोगाने दिनांक २० जून रोजीच्या पत्रान्वये अगामी दिनांक १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.हा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत केलेला आहे. त्यानुसार दूसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. २५ जून २०२४ ते १ ऑगस्ट २०२४ पुनरिक्षण पूर्व उपक्रम, २ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे, २ ऑगस्ट २०२४ ते १६ ऑगस्ट २०२४ दावे आणि आक्षेप दाखल करण्याचा कालावधी, विशेष मोहिमेची तारीख मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त होण्यावर, २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत दावे आणि हरकती निकाली काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डाटाबेस अद्यावत करणे व पुरवणी यादी छपाई करणे, २७ ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे असा आहे. वरीलप्रमाणे सुधारित कार्यक्रमानुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांना या कार्यालयामार्फत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी नागरिकांनी मतदार यादीच्या वरील सुधारित पुनरिक्षण कार्यक्रमाची कृपया नोंद घ्यावी व या कार्यक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button