प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांचे वतीने ग्रामपंचायत मालगुंड येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत ग्राम पंचायत मालगुंड येथे जिल्हा रुग्णालय रत्नागिरी व समता फाऊंडेशन मुंबई यांचे विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड व ग्रा देम पंचायत मालगुंड यांचे वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप तसेच मोतीबिंदू सदृश्य रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी मालगुंड च्या सरपंच श्वेता खेऊर् जिल्हा रुग्णालयाच्या डॉ उगवेकर, समता फाऊंडेशन मुंबई चे निमेश शेट्ये, नेत्रदान समुपदेशक श्री. चिंचोले प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर, गट प्रवर्तक श्रीमती आढाव तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी 89नागरिकांची तपासणी करून 51 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच 7 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी सोमवारची तारीख देण्यात आली. या वेळी आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..हे शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा जाधव मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.