नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या समस्येबाबत सभा आयोजित केल्याबद्दल‘मी रत्नागिरीकर’ मधील दोघांना नोटीस दिल्याने खळबळ
नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या समस्येबाबत सभा आयोजित केल्याबद्दल‘मी रत्नागिरीकर’ मधील दोघांना नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे. विजय जैन, व मिलींद किर यांना शहर पोलिसांनी बेकायदा जमाव सोशल मीडिया द्वारे गोळा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीस) याव्दारे आपणांस नोटीस देण्यांत येते की, आपणाव्दारे फेसबुक सोशल अकाऊंटवर दि.८|०७|२०२४ रोजी ०५.०० वा. सायंकाळी आम्ही रत्नागिरीकर या ग्रुपच्यावतीने रत्नागिरी शहरांमधील विविध प्रश्नांचे अनुषंगाने बैठक एका हॉटेलच्या हॉलमध्ये घेण्यांत येणार असल्याचे प्रसारीत केले गेले होते.आपणांस याव्दारे सूचित करण्यात येते की, मा. अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी दि. २/०७/ २०२४ रोजी मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(२) अन्वये दि.२२/०७/ २०२२३ रोजीपासून ते दि.०४/८/ २०२४ रोजीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू केलेला आहे. आपणाकडून वरीलप्रमाणे मनाई आदेशादरम्यान आयोजित केलेल्या रत्नागिरी शहर परिसरांतील बैठकीला आपण इतर संघटना, संस्था, मंडळे, महिला, जेष्ठ नागरीक, पालक, विद्याथीं, व्यापारी संघटना, विद्याथीं वाहतूक संघटना यांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन केले होते. द्वारे आपणाकडून अगर आपले हस्तकाकडून कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, आपणास जबाबदार धरण्यांत येईल व आपणांविरुध्द प्रचलित कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यांत येईल, याची नोंद घ्यावी. तसेच सदरची नोटिस आपणाविरुध्द मा.न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यांत येईल. सदरची नोटीस ही माझ्या सहीनिशी दखलपात्र गुन्हयांस प्रतिबंध म्हणून दिली आहे.आता या नोटीसी मुळे पुढे काय कारवाई होणार आहे याकडे आता लक्ष लागले आहे