रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोषदादा जैतापकर यांनी गुहागर विधानसभा मतदार संघात आमदार भास्कर जाधवाना जोरदारपणे धक्का दिला असून तालुक्यांतील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा कोकणचे सुपुत्र.तसेच गुहागर विधानसभाचे आधारस्तंभ नाम.मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यात आला.भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सभेत भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन उबाठा गटातील गुहागर विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते यांनी मा.मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.