मुंबई-गोवा महामार्ग यंदाही खड्ड्यात
_मुंबई-गोवा महामार्ग यंदाही हा मार्ग खड्ड्यात गेला आहे. पळस्पे ते नागोठणे या मार्गाचे काम पुन्हा सुरू केल्याने या मार्गात असंख्य खड्डे तयार झाले आहेत.यामुळे वाहनचालक आणि स्थानिक बेजार झाले आहेत. मंत्री राहिलेले सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या मार्गाने प्रवास करतात. तरीही ते महामार्गाची पाहणी करत असल्याने किती वेळा महामार्गाची पाहणी कराल? असा सवाल कोकणवासी करत आहेत.कोकण आणि गोव्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा मुख्य रस्ता आहे. दुहेरी वाहतूक असलेल्या या महामार्गावर अपघातांमुळे हजारो जीव गेल्यानंतर सरकारला जाग आली आणि महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले. मात्र कोकणाच्या बाबतीत इथेही उदासीनता दिसून आली. देशभरातील अनेक महामार्ग वेळेत पूर्ण होत असताना १२ वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होऊ शकले नाही.