
मुंबईतील बनावट नोटा प्रकरणात पाचव्या संशयिताला देखिल बेड्या ठोकल्या
मुंबईतील ७ लाख १० हजाराच्या बनावट नोटा प्रकरणात चिपळूण व खेडमधील एकूण चौघांना अटक केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी यात सहभाग असलेल्या आणखी एका पाचव्या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे अटकेतील संशयितांची संख्या पाचवर पोहोचली आहे.संशयितांकडून उपलब्ध होत असलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणात आणखी काहीजण मानखुर्द गुन्हे पोलीस शाखेच्या रडारवर असून त्यांचा शोध सुरू आहे. १९ जुलै रोजी मानखुर्द उड्डाणपुलाजवळ बनावट नोटा वितरित करण्यासाठी आलेल्या चिपळूण व खेडमधील शहानवाज आयुब शिरळकर, राजेंद्र आत्माराम खेतले, संदीप मनोहर निवलकर, ऋषिकेश रघुनाथ निवलकर या चौघांना मानखुर्द पोलिसांनी अटक करत त्यांच्या कारसह बनावट नोटा, मोबाईल जप्त केला. त्यानंतर गेल्या सोमवारी शहरातील खेड भागातून आणखी एकाला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. तपासात स्थानिक पातळीवरील आणखी काहींची नावे पुढे येत असल्याने तेही मानखुर्द गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.www.konkantoday.com