
दापोली हर्णे मार्गावर कारचा अपघात.
दापोली -हर्णे मार्गावर आसूद बाग येथे रविवार दिनांक २८ जुलै रोजी दुपारी दोन च्या सुमारास अपघात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणीही जखमी नाही.सर्व युवक दापोली मच्छिमार्केट परिसरात रहाणारे अरून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. दापोली तालुक्यातील सलग दुस-या दिवशी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी प्रवास करताना गाडी नदीत कोसळून अपघात झाल्याची दुसरी घटना आहे.