घर विक्रीच्या वादातून करबुडेत चौघांना मारहाण संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी तालुक्यातील करबुडे धनावडेवाडी येथे घर विक्रीच्या वादातून चौघांना मारहाण करण्यात आली. ही घटना २५ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली. मारहाणीमध्ये चौघांना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून पोलिसांनी मारहाण करणार्‍या संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला.अभिषेक सहदेव पवार, त्यांची आई छाया सहदेव पवार, पत्नी अर्चना अभिषेक पवार, कमल एकनाथ चव्हाण (रा. करबुडे, धनावडेवाडी, रत्नागिरी) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी मनोहर गणपत जाधव, त्यांची पत्नी, प्रतिक मनोहर जाधव व मनोहर यांच्यासोबत असलेला एक इसम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button