उरणमध्ये २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज नराधमाला फाशीची शिक्षा थोठावण्याची जमावाची मागणी

नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका तरुणीची हत्या करण्यात आली. उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे (२२) ही २५ जुलै रोजी गुरुवारी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दिडच्या सुमारास उरण बाझार पेठ येथे आढळून आली. मात्र त्या नंतर ती कुठेही दिसली नाही. मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच ति च्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार उरण पोलिस ठाण्यात दाखल केली.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार बेपत्ता असलेल्या तरुणीच्या शोधात असलेल्या उरण पोलिसांना २६ जुलै रोजी शुक्रवारी रात्रीच्या उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोलपंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळला.पोलिसांना मृतदेहची ओळख तात्काळ पटली असून,सदरचा मृतदेह पोलिसांकडून उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदणासाठी नेण्यात आला.सदर मृतदेह बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे या तरुणीचा असल्याची तपासात निष्पन्न झाले आहे.या तरुणीच्या शरीरावर विविध ठिकाणी तिक्ष्ण हत्याराने वार करून तिची क्रूरतेने हत्त्या केल्याची बाब समोर आली आहे.सदर घटनेची माहिती व्हाटशॉप द्वारे सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे. सदर घटणेबाबत सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून,तिव्र निषेध करण्यात येत आहे. काल २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्या पासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे मोट्ठी गर्दी केली होती. घडलेल्या घटनेचा सर्वांनीच जाहीर निषेध केला.यशश्री शिंदे या तरुणीच्या शरीरावर नाराधमाने विविध ठिकाणी वार आहेत.त्यामुळे सुरुवातीला तरुणीच्या मृतदेहची ओळख पटणे सुद्धा अवघड झाले होते.सदर घटना प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून समोर आली आहे.यशश्री शिंदे हिचा खून कोणी केला ? यशश्री शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला ? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत. या खुनातील आरोपीने तरुणीची हत्या करून उत्तरप्रदेशात पलायान केले असून,उरण पोलिस अवघ्या काही दिवसांच्या अवधीत आरोपीला जेरबंद करतील असा विश्वास उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी व्यक्त केला या अशा प्रकरणात पोलिस प्रशासनाने त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अंत्यत निर्दयी, क्रूर व निंदनीय असल्याने, मानव जातील काळिमा फासणारी घटना आहे.त्यामुळे सदर दोषी नराधम आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर राजकीय,सामाजिकसह सर्वच स्तरातील नागरिकांसह महिलांनी मोठ्ठा जमाव केला होता .या घटनेने संपूर्ण उरण तालुक्यासह मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत असून,उरण शहरातील व्यापारी असोसिएशननेही या तरुणीच्या हत्येचा निषेध व्यक्त करीत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याने शहरात शुकसुकाट पसरला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button