आम्ही रत्नागिरीकरच्या बोलावलेल्या सभेत सामंत समर्थकांनी घेतला ताबा व सभेत सामंत यांनी केलेल्या विकासाचा वाचला पाढा, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या नैसर्गिक आपत्तीमुळे झाल्याचा दावा, आयोजक सभागृहा बाहेर निघून गेले

आम्ही रत्नागिरीकर च्या वतीने आज रत्नागिरीतील रस्ते व अन्य मूलभूत सुविधांच्या समस्या बाबत सभा एका हॉटेलमध्ये लावण्यात आली होती या सभेला सामाजिक कार्यकर्ते विजय जैन राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर उपस्थित होते मात्र याचवेळी पालकमंत्री उदय सामंत यांचे शंभर वर समर्थक सभेस्थानी आले व त्यांनी या सभेचा ताबा घेतला आम्ही रत्नागिरीकर नागरिक म्हणून या सभेला आले असून सामंत यांनी केलेल्या विकास कामाची लिस्टच त्यांनी सभेत वाचून दाखवली रस्त्यावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांना बदनाम करण्याचे काही लोकांकडून जाणून बुजून प्रयत्न सुरू आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला शिवसेनेचे बिपिन बंदरकर यांनी उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या विकासासाठी काय काय केले याची भली मोठी यादीच यावेळी वाचून दाखवली सामंत यांनी रत्नागिरी मतदार संघ व शहरात विकास कामासाठी मोठा निधी व कामे केली असताना काही लोकांकडून मात्र विधानसभा निवडणुका जवळ आल्याने उदय सामंत यांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडिया वरून खड्ड्याच्या प्रश्नावरून अडचणीत आणण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत ते शिवसेना सहन करणार नाही असे सांगून यापुढे असे झाल्यास त्याला ठोकले जाईल असेही जाहीररीत्या सांगण्यात आले रत्नागिरीचे माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे यांनी रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असून पावसामुळे मारुती मंदिर ते जयस्तंभ रस्त्याचे काँक्रिटीकरण होऊ शकले नाही मात्र पावसानंतर दांडा फिशरीज पर्यंत काँक्रिटीकरण केले जाणार आहे काँक्रिटीकरण न झाल्याने काही भागात रस्त्यात खड्डे पडले ही वस्तुस्थिती आहे हे खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते सामंत यांनी रत्नागिरीत आल्यावर नगरपरिषदेत जाऊन याचा आढावाही घेतला हे खड्डे चिऱ्यांच्या तुकड्याने न भरता सिमेंट व फ्लेवर ब्लॉकने भरण्यात याव्यात अशा सूचना आम्ही शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना भेटून केल्या असल्याचे त्यांनी सांगितले रत्नागिरी शहरातील तयार करण्यात येणारे हे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे रस्ते 40 वर्षे टिकणार आहेत असाही दावा राजन शेटे यांनी केला त्यामुळे रत्नागिरी करणाऱ्या पुढे खड्ड्याची समस्या जाणवणार नाही व दरवर्षी रस्त्यावर खर्च होणारे नगरपरिषदेचे दहा कोटी रुपये वाचतील असाही दावा त्यांनी केला यावेळी सभेचे आयोजक विजय जैन यांना बाजू मान्य सांगण्यात आले त्यांनी तसा प्रयत्न करतात त्यांना रोखण्यात आले सामंत समर्थकांनी गदारोळ करीत उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून रत्नागिरी शहरात अनेक विकास कामे केली आहेत शैक्षणिक क्षेत्रापासून सामाजिक पर्यटन क्षेत्रात अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत त्यामुळे त्यांनी शहराचा विकास केला आहे मात्र त्याकडे विरोधकांकडून दुर्लक्ष करत केवळ रस्त्याचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे असाही दावा सामंत समर्थकांनी यावेळी केला व ते यावेळी आक्रमक झाले होते त्यामुळे ही सभा न होताच विजय जैन व मिलिंद किर यांनी सभेचे स्थान सोडले त्यामुळे मी रत्नागिरी कर यांची ही सभा होऊ शकलीनाही त्यानंतर माध्यमांशी बोलताना बिपिन बंदरकर यांनी विधानसभा जवळ आल्याने खड्ड्याच्या प्रश्नावरून सामंत यांना बदनाम करण्यात येत असून त्यांनी केलेली विकास कामे दुर्लक्षित केली जात आहे त्यामुळे केवळ सामंत यांना परत बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास अशांना आम्ही ठोकून काढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी उपस्थित असलेल्या असलेल्या माजी महिला नगरसेवकां यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी साठी मोठा निधी आणला असताना देखील त्यांना केवळ बदनाम करण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केला जात आहे रत्नागिरीतील रस्त्याला पडलेले खड्डे हे यावेळी झालेल्या अतिवृष्टी मुळे पडले असल्याचा दावा करीत नगरपरिषद प्रशासन खड्डे भरण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र निसर्गापुढे कोणाचे चालत नाही असाही दावा केला पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरासाठी अनेक विकास कामे केली असून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे असणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button