
पर्यटनाला चालना देण्यासाठी एक कोटींची हाऊस बोट देवून महिला बचत गटांना प्रोत्साहन
महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे तालुक्यातील ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. आमदार भास्कर जाधव यांनी ही योजना व्यापकपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांसमोर एक आदर्श ठेवला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने गुहागर तालुक्यासाठी आपण महिला बचत गटाला एक कोटी रुपये खर्च करून हाऊसबोट देणार आहोत. महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथील कार्यक्रमात केली.www.konkantoday.com