मंडणगड बसस्थानक आवारातील स्वच्छतागृह पुन्हा बंद

मंडणगड बसस्थानकाच्या आवारात असलेले मंडणगड शहरातील एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह पाण्याचा निचरा होत नसल्याने आगार व्यवस्थापकांनी वापरापासून बंद ठेवले आहे. यामुळे महिला व नागरिकांची मोठी गैयसोय होत आहे.या असणार्‍या गैरसोयीमुळे सर्वांनाच उघड्यावर विधी उरकावे लागत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजल्याची चर्चा आहे. या समस्येशी संबंधित असलेले आगार व्यवस्थापन व स्थानिक नगरपंचायत हे दोघेही समस्येकडे पाठ फिरवल्याने नागरिकांची मोठी गैयसोय झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button